बोदवड-प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या पुढाकाराने पूर्णत्वाला आलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हाडी येथे माता रमाई आंबेडकर स्मारकासाठी पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वाला आणले. आज माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्याला आमदार चंद्रकांतभाऊ पाटील आदी मान्यवरांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.