समाधान महाजन यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

वरणगाव-प्रतिनिधी | शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

आज शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात वरणगाव येथे सायंकाळी भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहून श्री. महाजन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला दणदणीत यश मिळणार असल्याचा आशावाद आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart