मुक्ताईनगर-प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने पूर्णत्वाला आलेल्या भगवान विश्वकर्मा सुतार भवनाचे लोकार्पण आज चंदूभाऊंच्या हस्त्ो व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगर मतदारसंघातील जवळपास सर्व समाजांसाठी भव्य सभामंडपे उभारण्यात येत आहेत. यात मतदारसंघातील सुतार समाजबांधवांसाठी आमदारांनी पाठपुरावा करून भव्य सभामंडपाची उभारणी केली आहे. आज या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची व सोबत समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.