मुक्ताईनगर-प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन आज करण्यात आले.
मुक्ताईनगर शहरातील एस. एम. कॉलेजच्या मागे संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटलांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी सभागृहाच्या साठी 50 लक्ष रुपयांच्या निधीमध्ये वाढ करून दोन कोटी रुपयांचा निधी वाढीव मंजूर करणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.