आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम
मुक्ताईनगर-प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चांगदेव महाराज तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले. आज दुपारी तापी-पूर्णा संगमावर प्रवासी बोटीतून संगमदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात पडण्याचा प्रकार घडला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल,धुळे यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तैनात असलेल्या बोटीने तातडीने बचाव कार्य करत संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. […]