मुक्ताईनगर-प्रतिनिधी | नियोजीत महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनातील घोळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले असून आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी यात सहभाग घेऊन पाठींबा दर्शविला.
या संदर्भातील माहिती अशी की, इंदूर ते हैदराबाद या नियोजीत राष्ट्रीय महामार्गासाठी सध्या भूमी अधिग्रहण करण्यात येत असून यात शेतकऱ्यांना शासकीय निर्णयानुसार मोबदला मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. समृध्दी महामार्गाला ज्याप्रमाणे दर देण्यात आला त्या विद्यमान दरानुसार भाव मिळावा अशी शेतकऱ्यांना मागणी आहे. यासोबत अंतुल ते मुक्ताईनगरच्या दरम्यान असलेल्या पुर्णाड फाटा येथील नियोजीत उड्डाणपुल रद्द करून येथे सर्कल उभारण्यात यावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले.
या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन याला पाठींबा दर्शविला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कंत्राटदाराने महामार्गाचे काम बंद केले.