मुक्ताईनगर-प्रतिनिधी | आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून कोथळी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बपू चौधरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
कोथळी येथील सोसायटी चेअरमन बापू चौधरी, अजय झोपे,अमित चौधरी,दिनेश राणे,चेतन झांबरे यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
‘याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज भाऊ राणे,शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील,शिवसेना चांगदेव पंकज कोळी, शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे, युवासेना उपजिल्हा संघटक प्रकाश गोसावी,युवासेना तालुकाप्रमुख गोलू मुऱ्हे,संतोष माळी,बाळा विटकरे, योगेश राणे,मोहन कोळी, कुणाल नारखेडे उपस्थित होते.