मुक्ताईनगर-प्रतिनिधी | आगामी संत चांगदेव-मुक्ताई यात्रोत्सवानिमित्त तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
महाशिवरात्रीनिमित्त चांगदेव-मुक्ताई यात्रेचे परंपरेनुसार आयोजन करण्यात आले असून यंदा देखील लक्षावधी भाविक यासाठी येणार आहेत. या सर्व भाविकांना सर्वतोपरी सुविधा प्रदान करण्यासाठी आज तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात आमदार पाटील यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिलेत.
याप्रसंगी मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, ज्ञानेश्वर हरणे, ह.भ.प उद्धव महाराज,भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार डॉ. निकेतन वाढे,पोलीस निरीक्षक श्री.नागेश मोहिते, गटविकास अधिकारी श्रीमती जाधव मॅडम, नगरपंचायत मुख्य अधिकारी श्री.गरकल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई,युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मौजे चांगदेव,चिंचोल,मेहून मंदिरातील व्यवस्थापक मंडळ तसेच सरपंच,ग्रामसेवक व शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.