जळगाव-प्रतिनिधी । महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी संपादीत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही जमीन अधिग्रहित झालेली आहे. मात्र जमीन आमदारांची आणि लाभ देताना दुसऱ्याचे नाव असा प्रकार उघड झाला असून याबाबत आमदार पाटील यांनी तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भूसंपादनात शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा फटका आमदार चंद्रकांत पाटलांनाही बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नऊ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी या इंदूर-खरगोन-मुक्ताईनगर-हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी संपादीत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही जमीन अधिग्रहित झालेली आहे. मात्र जमीन आमदारांची आणि लाभ देताना दुसऱ्याचे नाव असा प्रकार उघड झाला आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदौर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी शेत जमीन भूसंपादनात मोठा घोटाळा होत असल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांनी आरोप केला आहे. भूसंपादनात आमदार पाटील यांच्या नावावर असलेली जमीन बाळकृष्ण चौधरी यांच्या नावाने दाखवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठीच्या जमीन हस्तांतराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प दर दिला जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.