बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी २०० कोटींची तरतूद !

नागपूर– आमदार चंद्रकांत यांच्या पुढाकाराने बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या खर्चासाठी हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३,४४९ हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या खर्चासाठी हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाच्या कामास गती मिळणार असून यामुळे बोदवड तालुक्यातील सुमारे ११५०० हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे. या माध्यमातून आ.चंद्रकांत पाटील यांनी जनतेला दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे.

या प्रकल्पात जळगाव जिल्ह्यातील ३३,६६८ हेक्टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील १९,७८१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ हाेणार आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होऊन रखडलेल्या या प्रकल्पासाठी मागील पंचवार्षिक मध्ये आ.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने मागील काळात या योजनेच्या वितरण प्रणालीसाठी एक ६०० कोटी व दुसरी ६२५ कोटी अशा एकूण १२२५ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या होत्या यातून येथे काम सुरू झालेले असून नुकत्याच नूतन सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशन डिसेंबर२०२४ मध्ये सदरील सिंचन योजनेवर पुरवणी अर्थसंकल्पातून २०० कोटी रुपयाची तरतूद झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart