मुक्ताईनगर-प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर आगाराला दहा बसेस मिळाल्या असून आज यांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या २४ वर्षानंतर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन “१० एसटी बसेस” मुक्ताईनगर एसटी आगारात दाखल झाल्या असून आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी चक्क आमदार चंदूभाऊंनी स्वतः बस चालवली हे विशेष !
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जावरे, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, नितीनकुमार जैन आदींसह शिवसेना युवासेना, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एस टी महामंडळ आगार प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.